मुश्रीफांवर ED चा छापा पडताच अजित पवार कागल दौऱ्यावर; राजकीय चर्चांना उधाण

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत.गेल्या महिन्याभरापासून मुश्रीफ यांच्या घरावर आणि त्यांची सत्ता असलेल्या जिल्हा बँकेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती.याच जिल्हा बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना सुध्दा ED च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या कागल दौरा करणार आहेत.



कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि कागल मधील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी अजित पवार कागल दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी हसन मुश्रीफ जोरदार शक्तीप्रदर्शाच्या तयारीत आहेत.उद्या अजित पवार कागलमध्ये कागलचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज पुतळा सुशोभीकरण, कागल शहरातील श्रमिक वसाहतीमधील राजमाता जिजाऊ माँसाहेब या बगीचाचे लोकार्पण,निपाणी वेस येथील राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप अशा विविध विकासकामांचे लोकार्पण पवार करणार आहेत.दरम्यान संध्याकाळी गैबी चौकामध्ये युवक व महिला,शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने