‘या’ देशात फिरायला गेलात तर स्थानिक सरकारच तुमच्या राहण्यासह खाण्यापिण्याचा खर्च करणार…

मुंबई: जर तुम्ही परदेशात फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते. कारण आता एका देशातील सरकारने परदेशी पर्यटक जर त्यांच्या देशात गेले तर त्यांना पैसे देण्याची भन्नाट ऑफर सुरु केली आहे. त्या ऑफरनुसार तुम्ही फिरायला गेलात तर तेथील सरकार तुम्हालाही पैसे देणार आहे.पर्यटकांना पैसे देण्याची ऑफर जाहीर करणाऱ्या देशाचे नाव तैवान आहे. त्यामुळे तुम्ही जर तैवानला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शिवाय तिथे गेल्यावर तुम्हाला एक दोन नव्हे ५० हाजारांहून अधिक पैसे मिळू शकतात. चला तर मग तैवान सरकारची नक्की ऑफर काय आहे ते जाणून घेऊया.

तैवान सरकारने जाहीर केला अनोखा कार्यक्रम –

कोरोना महामारी (COVID-19 pendemic) मुळे संपूर्ण जगाच्या पर्यटन क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक देशांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी हवी तशी चालना अनेक देशातील पर्यटनाला मिळालेली नाही. अशा परिस्थितीत तैवान सरकारने आपल्या देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे.या कार्यक्रमानुसार देशातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी तैवान सरकारने पर्यटकांसाठी एक उत्तम ऑफर सुरू केली आली आहे. ज्यामध्ये तैवान सरकारने त्यांच्या देशाला भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना सुमारे १३ हजार रुपये दिले जाणार आहेत. या नवीन कार्यक्रमांतर्गत पर्यटक आणि टूर ग्रुप या दोघांनाही आर्थिक मदत दिण्यात येणार असून यामुळे देशातील पर्यटन उद्योग पुन्हा बळकट होऊ शकतो असं या सरकारचं म्हणणं आहे.



पर्यटकांना मिळणार पैसे –

CNN च्या रिपोर्टनुसार, नवीन पर्यटन कार्यक्रमांतर्गत, तैवान सरकार ५ लाख पर्यटकांना १३ हजार ६०० रुपयांचा हँडआउट देणार आहे. पर्यटक या हँडआउट्सचा वापर निवास, वाहतूक आणि इतर प्रवासासाठी खर्च करु शकतात. पर्यटकांसाठी हँडआउट्स व्यतिरिक्त, तैवान सरकार ९० हजार टूर ग्रुप्सना ५४ हजार ५०० पर्यंतचा भत्ताही देणार आहे. पर्यटकांना हे पैसे डिजिटल पद्धतीने मिळणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने