"न्यायालय देखील चुकू शकतं" ; उल्हास बापट असं का म्हणाले?

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या तीन दिवसांपासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजचा युक्तिवाद संपला असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. या सुनावणीत ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद पार पडला. या प्रकरणात विविध मुद्द्यांवर निकाल येणं अपेक्षित आहे. पण सध्या हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडं जाणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.या सुनावणीवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या तीन दिवसात न्यायालयात नबाम रेबिया प्रकरण चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे कोर्ट रेबिया प्रकरणानुसार निर्णय देणार की नबाम रेबिया प्रकरणातील निकालात सुधारणा करणार?, यावर उल्हास बापट यांनी त्याचे म्हणणे मांडले.






उल्हास बापट म्हणाले, न्यायालय देखील चुकू शकतं. न्यायालयाने आपले आधीचे निर्णय यापूर्वी फिरवले आहेत. न्यायालय चुकत नाही असं नाही. याआधी न्यायालयाने गोलकनाथ केसचा निकाल पुढे १३ जणांच्या घटनापीठाने बदलला होता. आधीचे निर्णय कोट केले जातात. त्यातील काही चुका सुधारून सात न्यायाधीशांचं बेंच सुधारून तो निर्णय संपूर्ण देशाला लागू होतात. दरम्यान कोर्टाने निर्णय राखून ठेवल्याने शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी न्यायालयीन लढाई सध्या खूपच अटीतटीची बनली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने