कोहलीची विकेट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! अंपायरच्या चुकीवरून सर्वत्र संताप

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताणा 263 धावा केल्या.भारताची सुरूवात खराब झाली. पण टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली चांगली फलंदाजी करताणा दिसला. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या धावसंख्येसाठी सज्ज झाला होता, परंतु एका वादग्रस्त एलबीडब्ल्यूमुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला.



विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी 129 चेंडूंत 59 धावांची भागीदारी केली. जडेजा 26 धावांवर आऊट झाला. 135 धावांच्या स्कोअरवर भारताची सहावी विकेट पडली. विराट कोहली 84 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. कुहमानने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. अंपायरने कोहलीला आऊट दिला, पण त्याने रिव्ह्यू घेतला. चेंडू एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले, पण अंपायरने त्याला बाद घोषित केले. हा निर्णय वादग्रस्त ठरू आहे.दुसऱ्या दिवशी भारताची सुरूवात खराब झाली, पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लियॉनने दबदबा राहिला. आधी लोकेश राहुल मग 100वा कसोटी सामना खेळणारा चेतेश्वर पुजारा लियॉनच्या गोलंदाजीवर LBW झाला. पुढच्याच षटकात लियॉनने रोहितचा ३२ त्रिफळा उडवला. तो इथेच थांबला नाही आणि त्याने श्रेयस अय्यरलाही आऊट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने