'चुकूनही विजय थलपतीच्या 'लिओ' सिनेमाचे फोटो -व्हिडीओ शेअर करु नका..नाहीतर..', वाचा

मुंबई: सध्या विजय थलपतीचा सिनेमा 'लियो'ची सगळीकडे चर्चा आहे. काही दिवस आधी दिग्दर्शक लोकेश कनगरादनं सिनेमाचा टीझर रिलीज केला होता,याला जबरदस्त रि्स्पॉन्स मिळाला. अर्थात असं असलं तरी सिनेमाचं शूट म्हणे अद्याप सुरु आहे.दिग्दर्शक आणि विजय थलपती सध्या सिनेमाच्या टीमसोबत काश्मिरमध्ये आहेत. सोशल मीडियावर शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यांना पाहून चाहत्यांनी मात्र उत्सुकता वाढली आहे.पण यामुळे मेकर्सचं मात्र टेन्शन वाढलं आहे. मेकर्सनी आता 'लियो' सिनेमाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना धमकी वजा इशारा दिला आहे.Leo च्या मेकर्सच्या वतीनं एका टेक्नॉलॉजी सिक्युरिटी कंपनीनं हा दम लोकांना भरला आहे. यामध्ये बोललं गेलं आहे की सोशल मीडियावर 'लियो' च्या शूटिंगशी संबंधित कोणते फोटो किंवा व्हिडीओ चुकूनही शेअर करू नका. जर असं कोणी करताना आढळून आलं तर त्या लिंक्सना कोणतीही वॉर्निंग दिल्याशिवाय हटवलं जाईल.



थलपती विजयच्या 'लियो' सिनेमात त्याच्या व्यतिरिक्त आणखीही बडे स्टार्स आहेत. यामध्ये तृष्णा कृष्णन,संजय दत्त, प्रिया आनंद,सॅंडी, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान आणि अर्जून सरजा सोबत इतरही अनेक तगड्या कलाकारांचा भरणा आहे.'लियो' सिनेमाचं शूटिंग २ जानेवारी रोजी सुरु झालं. लोकेश कनगराज 'लियो' चा फक्त दिग्दर्शक नाही तर त्यानं सिनेमाची कथा देखील लिहिली आहे. लिओ १९ ऑक्टोबरला तामिळ,कन्नड,तेलुगू आणि हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे.संजय दत्तनं खरंतर कन्नड आणि तेलुगू सिनेमात याधीच पदार्पण केलं आहे. आता 'लियो' सिनेमाच्या माध्यमातून तो तामिळ सिनेमात एन्ट्री करतोय.माहितीनुसार,'लियो' सिनेमात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहे. बोललं जातं की मेकर्सनी या भूमिकेसाठी संजय दत्तला १० करोड इतकी मोठी रक्कम ऑफर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने