Apple चे इंजिनियर सुद्धा फेल झाले होते ते बग नंदुरबारच्या लेकरानं कसं शोधलं ? जाणून घ्या डिटेल

पुणे: जगातभारी असणारी आपल्या देशातली पोरं असा काही कारनामा करतात की त्यांचं जगभर कौतूक होतं. अॅपल कपनीत कोट्यावधी पॅकेज घेणाऱ्या इंजिनिअर्सनाही जे जमलं नाही ते आपल्या नंदुरबारच्या पोरानं करून दाखवलं आहे.आपल्या लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित नसल्याची त्रुटी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील येथील ओम कोठावदे याने शोधून काढली आहे.ओम तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने डेमो व्हिडीओ सह ती तक्रार कंपनीकडे पाठवली. अॅपल कंपनीवाल्यांनी आभार मानत ओमला १३.५ हजार डॉलर म्हणजेच ११ लाख रूपये बक्षिस दिले आहे.


 

ओम हा खापर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुण्यात कंप्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे. गुगल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ओळखले जाते. प, ओमने हा भ्रम मोडून काढला. त्याने लॅपटॉपसोबत खेळत त्यातील डेटा सुरक्षे संबंधीत एक बग शोधला.ओमने चार महिन्यांपासून अमेरिकेतील ॲपल कंपनीच्या संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. यासह ॲपल कंपनीच्या सहकाऱ्यांशी बोलून लॅपटॉप स्क्रीन बंद असताना लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे त्याने पटवून दिले. त्यावरव उपाययोजना सुचवल्या, वेळोवेळी हा डेमो स्क्रीन शॉटच्या माध्यमातून व मेसेजिंगच्या माध्यमातून संबंधित कंपनीला केला.ही गोष्ट अॅपलने मान्य केली असून ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ॲपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, आपण पाठवलेला रिपोर्ट क्वॉलिफाय करण्यात आला आहे. यामुळे ॲपलची समस्या सोडण्यास मदत झाली आहे. तुम्हाला 13.5 हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत असल्याचे सांगत आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने