गणेश गायतोंडे परत येतोय? 'सेक्रेड गेम्स' बाबत अनुरागचं मोठं वक्तव्य

मुंबई: ओटीटीवर ज्या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं त्या सेक्रेड गेम्सची लोकप्रियता अजुनही कायम आहे. देशातील मनोरंजन विश्वात जेव्हा ओटीटीनं इंट्री केली तेव्हा प्रेक्षकांचं या नव्या माध्यमाकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ज्या मालिकांचा सिंहाचा वाटा होता त्यामध्ये अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्सचे नाव घ्यावे लागेल.विक्रम चंद्रा लिखित कादंबरीवर आधारित या मालिकेमध्ये बॉलीवूडचा स्टार अभिनेता नवाझुद्दीन सिद्धीका, पंकज त्रिपाठी, सैफ अली खान, राधिका आपटे, राधिका देशपांडे यांची प्रमुख भूमिका होती. आतापर्यत या मालिकेचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक, चाहते सेक्रेड गेम्सच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. याविषयी मालिकेचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.






अनुराग कश्यपच्या पहिल्या वेबसीरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. असं म्हटलं जातं ज्या ओटीटीवर ही मालिका प्रदर्शित झाली त्या नेटफ्लिक्सला देखील सेक्रेड गेम्सच्या निमित्तानं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. सेक्रेड गेम्स या मालिकेनं भारतामध्ये वेबसीरिजबाबत एक वेगळाच ट्रेंड सुरु केला. त्यानंतर वेगानं विविध विषयांवरील मालिका ओटीटीवर प्रदर्शित झाल्या. त्याचे श्रेय अनुराग कश्यपकडे जाते. असे म्हटले जाते. त्यानं आता आपल्या सेक्रेड गेम्स मालिकेच्या तिसऱ्या सीझनबद्दल केलेलं वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.गेल्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप हा त्याच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी चर्चेत आला आहे. त्यानं किंग खान पठाणबाबत दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता पुन्हा तो त्याच्या सेक्रेड गेम्सविषयी बोलून गेला आहे. बऱ्याच दिवसांपासून या मालिकेचा तिसरा सीझन येणार की नाही असा प्रश्न त्याला विचारला गेला होता त्यानंतर त्यानं त्यावर दिलेली प्रतिक्रिया मात्र चाहत्यांसाठी धक्कादायक असल्याचे म्हटलं जातंय.

अनुराग हा त्याच्या आगामी ऑलमोस्ट लव विग डीजे मोहब्बत नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका शो मध्ये आला होता. त्यावेळी त्यानं सेक्रेड गेम्सविषयी वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, मला वाटतं या मालिकेचा तिसरा सीझन काही येण्याची शक्यता नाही. त्याचे कारण सैफ अली खान आहे.दुसरं म्हणजे सैफची तांडव जेव्हा प्रसिद्ध झाली होती तेव्हा त्यावरुन झालेला वाद हा त्या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी डोकेदुखीचा विषय ठरला होता त्यामुळे आताही मला सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन तयार करुन पुन्हा वाद तयार करायचा नाही. आणि तसंही नेटफ्लिक्समध्ये तेवढी हिंमत नाही की ते त्या वादाचा सामना करु शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने