दुसरीतल्या चिमुकल्यालाही मोदींनी दिलं उत्तर, पत्र आणि उत्तर होतंय व्हयरल

बेंगळुरू: बेंगळुरू येथील इयत्ता दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, ज्यामध्ये त्याने मोदींची आई हीराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आता पंतप्रधान मोदींनी लहान मुलाच्या या हृदयस्पर्शी पत्राला उत्तर दिले असून त्यांचे हृदयस्पर्शी उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आरुष श्रीवत्स याने मोदींच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आईसाठी पाठवलेली प्रार्थना स्वीकार करण्याची विनंती केली आहे. मोदींच्या आईच्या निधनाची बातमी ऐकताच त्याला झालेले भावनिक दु:ख त्याने या पत्रातून व्यक्त केले आहे.



इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पत्र लिहिले

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या या लहान मुलाने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “तुमची प्रिय आई श्रीमती हिरा बेन यांचे वयाच्या शंभरीत निधन झाल्याचे टीव्हीवर पाहून मला खूप वाईट वाटले. कृपया माझ्या मनःपूर्वक संवेदना स्वीकाराव्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ओम शांती." पीएम मोदींनी आरुष श्रीवत्स याच्या करुणेबद्दल आभार मानले आणि ते म्हणाले की आईपासून दूर असलो तरी अशा प्रकारच्या करुणतेची ही भावना मला शक्ती देते. आणि माझी आई काय सोबत असल्याची भावना प्रबळ करते.

पीएम मोदींचे चिमुकल्याच्या पत्राला उत्तर, काय म्हणाले...

या पत्राला उत्तर देताना पीएम मोदींनी लिहिले की, “माझ्या आईच्या निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आईचे निधन ही आयुष्यातील अविस्मरणीय घटना असून त्याचे दु:ख शब्दांपलीकडे आहे. 25 जानेवारीच्या त्यांच्या पत्रात पुढे असे लिहिले आहे की, “तुमच्या विचारांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये माझा समावेश केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ही करुणता मला हे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य आणि धैर्य देते."

ही दोन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या खुशबू सुंदर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. पत्रासोबतच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “ही खऱ्या राजकारण्याची गुणवत्ता आहे! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी उदारपणे इयत्ता 2 च्या विद्यार्थ्याच्या शोक पत्राला उत्तर देतात. त्यांची हीच उदारता भविष्यात तरुण पिढीला योग्य दिशेने पुढे नेण्यास प्रेरणा देतील."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने