पेशंटला एन्ट्री दिली नाही म्हणून तालिबानी चिडले, पाकिस्तानवर जबरदस्त गोळीबार!

अफगाण: पाकिस्तान आणि तालिबानमध्ये वाद वाढत चालला आहे. तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांवर सतत भयंकर हल्ले करत आहेत. तालिबान दहशतवाद्यांनी पाकिस्तानसोबतची तोरखाम सीमा बंद केली आहे. तोरखाम ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील प्रमुख व्यापारी सीमा आहे. पाकिस्तान आपले आश्वासन पूर्ण करत नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार तालिबानच्या आयुक्तांनी सांगितले की, पाकिस्तानने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे आमच्या नेतृत्वाच्या आदेशाने आम्ही तोरखाम सीमा बंद केली आहे. अफगाणिस्तानमधील नागरीकांनी पूर्व नांगरहार प्रांतातील सीमा चौकीवर जाणे टाळावे. 



पाकिस्तानने अफगाण नागरिकांना उपचारासाठी येण्यास मज्जाव केल्याने तालिबान संतापला आहे. त्यामुळे त्यांनी संतापून तोरखाम सिमा बंद केली. या मार्गाने मध्य आशियातील देशांमध्ये व्यापार करणाऱ्या पाकिस्तानलाही मोठा फटका बसला आहे. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कहर बल्खी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल यांना इशारा देताना म्हटले आहे की, 'जगातील अनेक देशांपेक्षा अफगाणिस्तानची सुरक्षा उत्तम आहे.'तसेच ड्युरंड लाईनवर पाकिस्तान आणि तालिबानमध्ये जोरदार गोळीबार झाला. स्थानिक लोकांनी गोळीबार झाल्याची पुष्टी केली आहे. या गोळीबार धोकादायक शस्त्रांचाही वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान आणि तालिबानमधील संबंध बिघडले असल्याचे पाकिस्तावनी मीडियाने स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी तोरखाम सीमेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने