PM मोदींचं लक्ष असणाऱ्या 'या' राज्यात भाजपने केले मोठ्ठे बदल; 'यांच्या'वर सोपवली महत्वाची जबाबदारी

दिल्ली: कर्नाटकात या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी  भाजपनं  जोरदार तयारी केलीये. पक्षानं आज (शनिवार) केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांची कर्नाटकातील निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केलीये.तर, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांना राज्याचे सहप्रभारी बनवण्यात आलंय. विशेष म्हणजे, कर्नाटकातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी लोकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे.प्रधान यांच्याकडं यापूर्वी अनेक राज्यांतील निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाला आशा आहे की, एक सक्षम नेता म्हणून ते राज्यात संघटन करतील आणि स्थानिक घटकातील अंतर्गत समस्या सोडवतील, जेणेकरून दक्षिणेकडील या महत्त्वाच्या राज्यात सत्ता टिकवण्यासाठी पक्षाला जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील. कर्नाटकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासर अमित शहा यांचे विशेष लक्ष आहे. येत्या सोमवारी मोदींचा कर्नाटक दौरा असणार आहे.



सिक्कीम भाजपच्या पक्ष संघटनेतही फेरबदल

याशिवाय, भाजपनं सिक्कीममधील पक्ष संघटनेतही फेरबदल केले आहेत. सिक्कीममध्ये पक्षानं डीआर थापा यांना प्रदेशाध्यक्ष बनवलंय. तर, पक्षाचे आमदार एनके सुब्बा यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीये. आमदार डीटी लेपचा यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने