भाजप नेत्याच्या घरी सापडले आठ कोटी अन् अटक मात्र मनिष सिसोदीयांना! केजरीवाल गरजले

मुंबई: आम आदमी पार्टीने शनिवारी कर्नाटकातील विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात दावणगेरे शहरात एका मोठ्या कार्यक्रमाने केली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका जाहीर सभेला संबोधित केले.जाहीर सभेला संबोधित करताना केजरीवालांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजप नेत्याचा मुलगा 8 कोटी रुपयांसह पकडला गेला. त्याला अटक झालेली नाही, कदाचित पुढच्या वर्षी त्याला पद्मभूषण देण्यात येईल.त्याच्या घरात 8 कोटी रुपये सापडले अटक मात्र मनीष सिसोदिया यांना केली आहे. मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काहीही मिळालेले नाही. मनीष सिसोदियांनी भ्रष्टाचार केला असल्याचं सांगतात पण छाप्यात त्यांच्याकडे फक्त 10 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. सिसोदिया यांच्या बँक लॉकरमध्येही त्यांना काहीही मिळालेले नाही. अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.



मनिष सिसोदिया यांना अटक; काय आहे प्रकरण?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे.दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली 'लीक' करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला आहे.२६ फेब्रुवारीला सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केलं होतं की, "आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे.तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे.अशा खोट्या आरोपांमुळं तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे." सिसोदियांना अटक करण्यापुर्वी त्यांच्या घराबाहेर प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यांनंतर २६ फेब्रुवारीला चौकशीनंतर सीबीआयने अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने