सतिश कौशिक यांच्या मृत्यूसंदर्भात आणखी एक खळबळजनक दावा..समोर आलं दाऊद कनेक्शन

मुंबई: अभिनेता सतिश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. सतिश कौशिक हे आपल्या मृत्यूच्या काही वेळ आधीपर्यंत गुरुग्राम येथील फार्महाऊसवर पार्टी करत होते. त्या फार्महाऊसचा मालक आणि सतिश कौशिक यांचा मित्र विकास मालू सध्या संशयाच्या घेऱ्यात आहे.महत्त्वाची गोष्ट अशी की विकास मालूवर हा संशय सगळ्यात आधी त्याच्याच पत्नीनं घेतला होता. दिल्ली पोलिसांनी विकास मालूच्या पत्नीची साक्ष नोंदवून घेतल्यानंतर त्याआधारे ते पुढील तपास करत आहेत.

पण यादरम्यान आणखी एक महत्त्वाचा दावा काही मीडिया रिपोर्टनुसार केला जात आहे. विकास मालू याच्या पत्नीनं दिल्ली पोलिसांना एक पत्र लिहून आपला संशय व्यक्त केला होता की सतिश कौशिक यांच्या रहस्यमय मृत्यू मागे तिच्या पतीचा हात असू शकतो.यासोबतच विकास मालूच्या पत्नीनं त्या पत्रात दुबईतील एका पार्टीचा उल्लेख देखील केला होता.आता काही मीडिया रीपोर्टमध्ये देखील बोललं जात आहे की विकास मालू याच्या पत्नीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की,२३ ऑगस्ट २०२२ रोजी तिच्या बिझनेसमन पतीनं म्हणजे विकास मालूनं दुबईत एका पार्टीचं आयोजन केलं होतं.



या पार्टीत अभिनेता सतिश कौशिक देखील उपस्थित होते. विकासनं तेव्हा पत्नीला सांगितलं होतं की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा अनस देखील त्या दुबईच्या पार्टीत हजर होता. मालूच्या पत्नीनं आता दावा केला आहे की या पार्टीनंतर सतिश कौशिक आधी विकास मालूच्या घरी गेले होते आणि तिथे १५ करोड रुपयांवरनं वाद झाला होता.फार्महाऊसचा मालक आणि व्यावसायिक विकास मालूविषयी त्याच्याच पत्नीनं दावा केला होता की तिच्या पतीनं तिला सांगितलं होतं की एक दिवस तो रशियन मुलींना बोलावून सतिश कौशिक यांना ब्लू पिल्स देईल.

सतिश कौशिक यांनी १५ करोड विकास मालूला दिले होते पण त्यानं ते पैसे खर्च केले. जेव्हा सतिश कौशिक दुबईला पार्टीला गेले होते तेव्हा या पैशावरनं दोघांमध्ये वाद रंगला होता. ज्यानंतर विकास मालूनं कौशिक यांना पिल्स देण्याची गोष्ट बोलली होती.अर्थात या प्रकरणाला एक दुसरी बाजू आहे की विकासच्या पत्नीनं आपल्या पती विरोधात वाईट कृत्य केल्या प्रकरणात केस दाखल केली आहे. ही केस जवळपास २ महिने आधी दाखल केली आहे.सतिश कौशिक यांचे निधन गेल्या गुरुवारी झाले. ते विकास मालूच्या फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले होते. पण रात्री उशिरा त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.त्यानंतर फार्महाऊसवर तपास केल्यानंतर पोलिसांना तिथे काही औषधे मिळाली. पण या प्रकरणात पोलिसांना अद्याप संशयास्पद असं काही सापडलेलं नाही. पण बोललं जात आहे की पोलिस लवकरच या प्रकरणात विकास मालूच्या पत्नीची साक्ष नोंदवून घेणार आहेत. पोलिस त्यांच्या पद्धतीनं केसचा तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने