'सावरकरांनी 50 वर्षे शिक्षा भोगली, राहुल गांधी एक तास कारागृहात राहु शकत नाहीत'

मुंबई: राज्यातील 288 मतदारसंघांत भाजप आणि शिवसेना यांच्या वतीनं 'सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येणार आहे. या यात्रेत सर्व नेते, पदाधिकारी, बूथ कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.ते माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचंमोठं योगदान आहे. हे नाकारुन चालणार नाही. सावरकरांचं हे योगदान १३० कोटी भारतीय कधीच विसरु शकत नाहीत.'



मदनलाल धिंगरा हे सावरकरांचे पहिले हुतात्मा शिष्य होते. अनेक क्रांतीवीरांनी सावरकरांसोबत येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. १८५७ चा उठाव झाला होता. या उठावाचा इतिहास कोणी लिहिला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिला, असं बावनकुळेंनी सांगितलं.लंडनमध्ये क्रांतीवीरांना मदत करताना सावरकरांना अटक करण्यात आली होती. दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांनी सुमारे ५० वर्षे भोगल्या. हे सांगताना त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी कारागृहात एक दिवस राहु शकत नाही, एक तास राहु शकत नाही, असा त्यांनी निशाणा साधला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने