'जर आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री देखील अपात्र होतील', काय सांगतात कायदेतज्ञ

मुंबई:  महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सत्तासंघर्षाच्या या सुनावणीकडं लागलंय. येत्या 48 तासांत सत्ता संघर्षांची सुनावणी संपणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. 2 मार्चला झालेल्या मागील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाने युक्तिवाद सुरू केला. शिंदे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. आजही त्यांचा युक्तिवाद होईल. असातच कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी काही महत्वाच्या बाबी मांडल्या आहेत.



कायदेतज्ञ उल्हास बापट महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलताना म्हणाले की,निवडणुक आयोगाच्या निकालाचा परिमाण सुप्रीम कोर्टावर बंधंनकारक नसतो. माञ सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणुक आयोगावर बंधनकारक असतो. निवडणुक आयोगावर अनेकांचा विश्वास नाही. निवडणुक आयोगाचे सर्व अधिकार पंतप्रधान यांच्याकडे आहेत. अनेकांना कायदा कळत नाही म्हणून अनेकदा चुकीचा निर्णय देतात. असाच निर्णय याआधी आयोगाने दिला आहे असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलं आहे.तर याआधी देखिल सुप्रीम कोर्टाने सांगीतले होते की, समिती नेमा आणि निवडणुक आधिकारी समितीने नेमावा मगच सगळे नीट होईल. न्यायालय कदाचित सुनावणीसाठी आठ दिवस वेळ घेईल, ही दिरंगाई होत आहे. सरकार घटनात्मक आहे की नाही लवकर ठरवलं पाहिजे. निर्णय यायला उशीर होतोय हे चुकीचं आहे. जर आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री देखिल अपात्र होईल असंही उल्हास बापट यावेळी म्हणालेत.

राज्यात राष्ट्रपती लागू शकेल कारण राज्यात सध्या कुणाकडेच बहुमत नाही. राजकीय भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा काढण्यात आला आहे. निकाल लवकरात लवकर लागावा. पुढील आठवडयात निर्णय देणं आवश्यक आहे तेच कायद्यात बसतं. स्पीकरने निर्णय किती वेळात द्यायचा हे कायद्यात कुठच सांगितल नाही याचा तोटा होऊ शकतो असंही बापट यावेळी म्हणाले आहेत.हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच जायला हवं आणि तसंच होईल कारण कायदाच सांगतो की हे सगळ विधानसभा अध्यक्ष ठरवू शकतात असंही उल्हास बापट यावेळी म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने