सभागृहात राष्ट्रवादीचा गदारोळ! भाजप आमदाराकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख, अन्....

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. भाजप आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ झाला. यावेळी अजित पवार देखील आक्रमक झाले होते. अजित पवार आमदारांसह वेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी अध्यक्षांनी देखील रेकॉर्ड तपासणार असल्याचे सांगितले. मात्र विरोधी आमदारांनी राम सातपुते यांनी माफी मागावी अशी मागणी केली.अजित पवार म्हणावे, असे पायंडे पडणार असतील तर आमच्या बाजूने देखील वरीष्ठ नेत्यांबाबत वेगळ्या प्रकारची वाक्यरचना करण्यात येईल. माफी मागितली जाणार नाही, आम्ही म्हणू तापासा असेल तर तपासा आणि रेकॉर्डवरून काढायचं असेल तर काढा.



यावेळी अजित पवार यांनी अध्यक्षांना हात जोडून विनंती केली. आम्ही जसा वरिष्ठांचा आदर करतो तसा त्यांनी देखील आमच्या नेत्यांचा आदर केला पाहीजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवारांचे कौतुक केले आहे. त्यामुळे सभागृहात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख योग्य नाही, या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. यावेळी आशिष शेलार म्हणाले शरद पवार यांचा एकेरी उल्लेख, अपमान आम्हाला मान्य नाही. यावेळी आशिष शेलार यांनी माफी मागितली. तसेच त्यांनी राम सातपुते यांना माफी मागण्याची विनंती केली. राम सातपुते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केले. यावर मी आक्षेप घेतला. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसत मला चाकरी करावी लागली असती, असे आव्हाड म्हणाले होते. तरी देखील सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.

काय म्हणाले होते राम सातपुते -

"मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही", असे वक्तव्य राम सातपुते यांनी केल्यानंतर विधानसभेत गोंधळ उडाला.विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर राम सातपुते यांनी माफी मागितली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने