शपथविधीला तीन दिवस शिल्लक असतानाच भावी मुख्यमंत्र्यांना मोठा दणका; 'या' आमदारांनी काढून घेतला पाठिंबा!

मेघालय: मेघालय विधानसभा निवडणुकीनंतर  सरकार स्थापनेसाठी संघर्ष सुरू आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी इतर प्रादेशिक पक्षांसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली.मात्र, संगमांच्या समर्थनार्थ असलेल्या दोन आमदारांनी पाठिंबा काढून घेतलाय. राज्यपालांसोबतच्या बैठकीत संगमा यांनी 32 आमदारांच्या सह्यांचं समर्थन पत्र सुपूर्द केलंय.60 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 31 आहे. परंतु, संगमा यांना सरकार स्थापन करण्यासाठी अतिरिक्त आमदार मिळवण्यात यश आलंय. शपथविधी सोहळ्यासाठी 7 मार्च ही तारीखही निश्चित करण्यात आलीये. समर्थन पत्रावर एनपीपीच्या 26, भाजपच्या दोन, हिल्स स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा  एक आणि दोन अपक्ष आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आमच्याकडं पूर्ण बहुमत आहे. भाजपनं (BJP) आधीच पाठिंबा दिलाय. अन्य काही आमदारांनीही पाठिंबा दिला आहे, असं संगमा यांनी सांगितलं होतं.




विशेष म्हणजे, शुक्रवारी संध्याकाळपर्यंतच HSPDP नं संगमा यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि आपल्या आमदारांना NPP-नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ नये, असं पत्र जारी केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एचएसपीडीपीचे अध्यक्ष केपी पांगनियांग यांनी कॉनराड संगमा यांना पत्र लिहून त्यांच्या पक्षाचे दोन आमदार मेथोडियस डखार आणि शकलियार वार्जरी हे त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असं म्हटलंय. एचएसपीडीपीला या प्रकरणात स्वारस्य नाही आणि म्हणून आम्ही आमचा पाठिंबा काढून घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र, एनपीपी आणि एचएसपीडीपी यांच्यातील या पत्रांच्या देवाणघेवाणीवर कोणतंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने