तुम्ही गाडी चालवता? मग PUC सर्टिफिकेट असायलाच हवं नाहीतर भरावा लागेल इतका दंड

मुंबई: मोटर वाहन अधिनियम 2019 मध्ये आल्यानंतर गाडीपासून होणारे पोलूशनला घेऊन खूप काळजी घेतली जात आहे. अशात PUC सर्टिफिकेट म्हणजेच पोलूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट गाड्यांसाठी अनिवार्य करण्यात आलंय. याचा उद्देश्य वाढत्या एयर पोलूशनला कंट्रोल करण्यासाठी केला जातो.PUC देताना पाहिले जाते की कोणती गाडी स्टँडर्डपेक्षा जास्त पोलूशन तर करत नाही. गाडीचे पुर्ण पोलूशन टेस्ट झाल्यानंतर PUC सर्टिफिकेट दिले जाते.


PUC सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागेल इतका दंड

नवी गाडी घेतल्यानंतर PUC सर्टिफिकेट गाडीची खरेदी करताना दिली जाते ज्याची वॅलिडीटी एका वर्षापर्यंत असते. एका वर्षानंतर आपल्याला पुन्हा गाडीची PUC टेस्ट करावी लागते ज्यानंतर पुन्हा सर्टिफिकेट नव्याने मिळतं.याची वॅलिडिटी 3-6 महिने होती. PUC सर्टिफिकेटसाठी 60-100 रुपये लागतात. याची विशेषत: म्हणजे प्रत्येत राज्याचा PUC सर्टिफिकेट दूसऱ्या राज्यात वॅलिड मानला जातो. PUC सर्टिफिकेट नसल्यामुळे 10 हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो.



PUC सर्टिफिकेट कसं मिळवायचं?

PUC सर्टिफिकेटसाठी आपल्याला पेट्रोल पंप जावं लागेल. देशातील प्रत्येक राज्याच्या पेट्रोल पंपपर पोलूशन चेक सेंटर असतं. हे सर्व सेंटर त्या राज्यातील ट्रांसपोर्ट विभागाचे ऑथॅाराइज्ड असतात. तुमच्या PUC सर्टिफिकेटवर सीरियल नंबर असतो. सोबतच गाडीचं लायसेंस प्लेटचा नंबर असतो.ज्या दिवशी गाडीची टेस्ट केली जाते त्या दिवशीची तारीख असते. PUC सर्टिफिकेटवर एक्सपायर होणाऱ्या तारखेसोबत टेस्टमध्ये केलेले निरीक्षणचं ब्योरंही असतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने