तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं मिशन महाराष्ट्र पोहरादेवीतून सुरू होणार! थेट पंतप्रधानपदावर डोळा

मानोरा : देशाच्या राजकारणात आता २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कंबर कसली आहे. राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या वतीने माजी खासदार हरिसिंग राठोड श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे २९ मार्चला देशव्यापी महामेळावा घेणार आहे.देशात भाजपा पक्षाला पर्याय म्हणून तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटविण्यासाठी विरोधी गटातील प्रमुख यांना एकत्र करण्याची तयारी सुरु केली आहे. 




यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल, भगवंत मान, पिनराई विजयन व अखिलेश यादव यांचे सोबत बैठक झाली आहे. त्यांनी आपले लक्ष महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर केंद्रित करण्यासाठी बहुजन व गोर बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यात श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेच्या पूर्वसंध्येला माजी खासदार हरिसिंग राठोड यांचे पुढाकारातून २९ मार्च ला भटके विमुक्त, बारा बलुतेदार,एस. टी. एस. सी. अल्प संख्याक व वंचित ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित केला आहे. 

या महामेळाव्यास बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज, गोपाल चैतन्य महाराज, देवीभक्त कबीरदास महाराज, देविभक्त शेखर महाराज, यशवंत महाराज, प्रेमदास महाराज, दिलीप महाराज, रमेश महाराज, गोकुळ महाराज भारत राष्ट्र समितीचे खासदार, आमदार पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. सर्व समाज बांधव शेतकरी, शेतमजूर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी खासदार हरिसिंग राठोड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने