राष्ट्राध्यक्षांच्या अत्यंत जवळचे ली कियांग बनले चीनचे नवे 'पंतप्रधान'; NPC कडून मान्यता

चीन: ली कियांग यांनी आज चीनचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. चीनच्या संसदेनं राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे जवळचे सहकारी ली कियांग यांना देशाचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित केलं.सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे  ठराव नियमितपणे पास करणाऱ्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या  वार्षिक अधिवेशनात ली कियांग यांच्या उमेदवारीला मान्यता देण्यात आली. ली यांच्या नावाचा प्रस्ताव खुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ठेवला होता.



ली कियांग चीनचे नवे पंतप्रधान

63 वर्षीय ली कियांग हे शी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. शी जिनपिंग यांच्यानंतर ली कियांग हे सीपीसी आणि सरकारमधील क्रमांक दोनचे अधिकारी असतील. 10 मार्चला चीनच्या संसदेनं शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळाला पाठिंबा दिला. सलग तिसऱ्यांदा त्यांची अधिकृतपणे चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर अध्यक्षपदी तिसऱ्यांदा विजयी होणारे शी जिनपिंग हे पहिले चिनी नेते ठरले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने