जैन, सिसोदियांच्या राजीनाम्यानंतर 'यांना' मिळणार मंत्रीपद; केजरीवालांनी एलजींकडं पाठवली नावं

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे.आमदार सौरभ भारद्वाज  आणि आतिषी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन्ही आमदारांची नावं लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडं पाठवली असल्याचं सांगण्यात येत आहे.वास्तविक, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन  यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 



अरविंद केजरीवाल यांनीही दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. मनीष आणि सत्येंद्र यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिमंडळात दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना रविवारी आठ तासांची चौकशी झाल्यानंतर सीबीआयनं अटक केली. दिल्लीत उत्पादन शुल्क विभागाच्यावतीनं सुरु केलेले नवे मद्य धोरण सिसोदिया यांच्या अटकेस कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. या धोरणावरुन सिसोदिया यांची याआधी देखील अनेकदा चौकशी झालेली आहे. उपमुख्यमंत्री सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचं कारण सीबीआयनं पुढे करत त्यांना अटक केलीये.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने