राजाचा झाला रंक; कोट्यवधी रुपयांत लोळणाऱ्या मोदीकडे राहिले फक्त २३६ रुपये

मुंबई:  भारतातली दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चर्चेत आलेला नीरव मोदी सध्या वाईट अवस्थेत आहे. एकेकाळी पैशांत खेळणाऱ्या नीरव मोदीच्या बँक खात्यात फक्त २३६ रुपये राहिले आहेत.काही माध्यमांनी याविषयीचं सविस्तर वृत्त दिलं आहे. नीरव मोदीकडे कोर्टाच्या फीज भरण्यासाठीची आता पैसे राहिलेले नाहीत, अशी माहिती हाती येत आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एकेकाळी देशातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या नीरव मोदीच्या (Nirav Modi) बँक खात्यात फक्त २३६ रुपये राहिलेले आहेत.



त्याची कंपनी फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या अकाऊंटमधून इनकम टॅक्सची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. कंपनीच्या खात्यातून २.४६ कोटी रुपये एसबीआयच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या व्यवहारांनंतर नीरव मोदीकडे एवढीच रक्कम शिल्लक आहे.

काय आहे प्रकरण?

२०१९ पासूनच नीरव मोदी अडचणीत यायला सुरुवात झाली. पंजाब नॅशनल बँकेने त्याच्यावर आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीवर (Mehul Choksey) बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने १३,५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दोघांचीही चौकशी सुरू झाली आणि १९ मार्च २०१९ रोजी त्याला होलबोर्न इथून अटक करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने