पुण्यातील 'त्या' अघोरी प्रकाराची विधीमंडळात चर्चा; फडणवीसांनी दिली माहिती

पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात जानेवारी महिन्यात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला होता. हदरवून टाकणाऱ्या या घटनेत जादूटोणा करत अघोरी पूजा करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाची विधीमंडळात देखील दखल घेण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सभागृहाला माहिती दिली.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात माहिती दिली की, पुण्यात एका महिलेला गर्भधारणा व्हावी म्हणून'अघोरी पूजे'च्या नावाखाली मानव आणि प्राण्यांच्या हाडांच्या पावडरचे सेवन करण्यास भाग पाडले गेले.त्यानंतर या प्रकरणी सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या महिलेच्या कुटुंबाविरूद्ध IPC आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार एफआयआर नोंदविला आहे. घटना जानेवारी मध्ये घडली आणि एफआयआर 18 जानेवारी रोजी नोंदविला गेला.



नेमकं काय घडलं होत?

पुणे शहरातील धायरी भागात हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी व मुल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केली. शिवाय आरोपी पती तसेच घरातील इतर जणांनी संगनमत करून विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ करून वारंवार मारहाण केली होती.एका अमावस्येला या महिलेच्या पतीसह घरातील सर्व मंडळींनी पीडितेला घराजवळील स्मशानभूमीत नेलं. स्मशानात असलेले प्रेताची हाडे आणि राख घरी आणली. तसेच त्याची पूजा केली. हे एवढ्यावर न थांबता त्यांनी स्मशानातील राख पाण्यात टाकून जबरदस्तीने पीडितेला पिण्यासाठी दिली. तर हाडांची पावडर करून तिला खाऊ घातली. या सगळ्या त्रासाला वैतागून अखेर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने