करंजी खाल्ली म्हणून थेट नोकरी वरुन काढलं... पायलेट काय विमानात काहीच खाऊ शकत नाही?

मुंबई: होळी साजरी करण्याची क्रेझ तर तशी आता संपली आहे पण याच दरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आपण सगळेच होळीच्या दिवशी खूप मजा मस्ती केली असेल टेस्टी पदार्थ खाल्ले असतील... अशीच एका पायलेटने कॉकपिटमध्ये करंजी खाल्ल्याने त्याला नोकरी वरुन काढून टाकलं आहे.विमानाची सुरक्षितेसाठी पायलेटला काही नियमांचे पालन करावे लागते, ज्यात कॉकपिटमध्ये पायलट काय करु शकतो आणि काय करु शकत नाही हे सांगितले आहे. पण म्हणजे नक्की कोणकोणते बंधनं? चला जाऊन घेऊयात...

कॉकपिट म्हणजे काय?

कॉकपिट म्हणजे विमानाचे केबिन किंवा जागा, जिथून पायलट आणि को-पायलेट विमान उडवण्याचे काम करतात. ही केबिन पायलट आणि को-पायलेट दोघांसाठी एका ऑफिससारखी काम करते. पायलटला इतर माहितीसुद्धा इथूनच मिळते. यासोबतच विमानाचे ९० टक्के नियंत्रण इथेच असते, अर्थात ही खूप महत्वाची जागा आहे, अशात या जागेत काय करु शकत नाही, बघूया...



पायलट कॉकपिटमध्ये काय करु शकत नाहीत

- खरंतर, कोणत्याही विमान कंपनीच धोरण सारखे नसते, पण बरेचसे समान असते. यामध्ये जेवणाबाबतही विशेष नियम आहेत. उदाहरणार्थ, काही फ्लाइट्समध्ये विमान उडवतांना, पायलटला कॉफी पिण्यासही मनाई आहे, तर काही विमान कंपन्यांमध्ये सूट दिली जाते. यासोबतच सर्व एअरलाइन्स पायलटच्या कॉकपिटमध्ये काहीही खाण्यास बंदी घालतात.

- यासोबतच विमान कंपन्या 8R नियम पाळतात. यामध्ये पायलेट २४ तासांपूर्वी दारु पिऊ शकत नाही. म्हणजेच फ्लाइटच्या आधी ते अल्कोहोल घेऊ शकत नाहीत.

- अनेक विमान कंपन्यांनी पायलटच्या कॉकपिटमध्ये पुस्तके वाचण्यास बंदी घातली आहे, तर काही एअरलाइन्सने फक्त वर्तमानपत्र वाचण्याची परवानगी दिली आहे.

- पायलेटला फ्लाइटमध्ये आराम करण्याची परवानगी आहे, पण त्यावेळी दुसरा पायलट सीटवर असणे आवश्यक आहे. पायलटला कामाचा जास्त ताण दिला जात नाही.

- यासोबतच कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर यांनाही बीन्स खाण्यास मनाई आहे. याचे कारण असे की, कोणत्याही खाद्यपदार्थाची समस्या असल्यास दोन्ही वैमानिकांना कोणतीही अडचण येऊ नये. म्हणूनच वेगवेगळे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे एका पायलटला समस्या आली तर दुसरा पायलट तो हाताळू शकतो.

- विमान उडवतांना पायलटला कॉकपिटमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट चालवण्यास मनाई आहे. तसेच दोन्ही पायलट एकत्र झोपू शकत नाहीत. पायलट सीटवर असणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने