हिंडेनबर्गच्या जाळ्यात फसलेल्या अमृता अहुजा आहे तरी कोण?

अमेरिका: गौतम अदानी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर आता अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चनं मोर्चा ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्याकडे वळवला आहे. त्यामुळं आता डोर्सी यांच्या कंपनीचे शेयर्स कोसळण्यास सुरुवात झाली असून भांडवली बाजारात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हिंडेनबर्गने सादर केलेल्या नव्या रिपोर्टमध्ये जॅक डोर्सी यांच्या मालकीची कंपनी ब्लॉक इंकवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक नावं घेतलं जात ते म्हणजे अमृता अहुजा. अहुजा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर या अहूजा नेमक्या आहेत तरी कोण असा सवाल उपस्थित होत आहे. 

भारतीय वंशाच्या अमृता आहुजा या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच सीएफओ आहेत. अमृता यांच्यावर ब्लॉक इन्सचे शेअर्स डंप केल्याचा आरोप आहे. त्या ब्लॉक इंकच्या 2019 मध्ये कंपनीत रुजू झाल्या. 2021 मध्ये त्यांना ब्लॉक इंकचे सीएफओ बनवण्यात आले.द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, त्यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत. ते क्लीव्हलँडमध्ये डे-केअर सेंटर चालवतात. अमृता यांनी Airbnb, McKinsey & Company, The Wall Disney, Fox सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. कॉल ऑफ ड्यूटी, कँडी क्रश, वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट यांसारखे गेम तयार करण्यासाठी त्यांनी व्हिडिओ गेम निर्माता ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डसोबत काम केले.



2021 पासून ब्लॉक इंकसोबत

अमृता यांनी 2001 मध्ये मॉर्गन स्टॅनलीसोबत बँकर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2019 मध्ये, त्या ब्लॉक इंकमध्ये सहभागी झाल्या. 2021 मध्ये त्यांना सीएफओ बनवण्यात आले. फॉर्च्युन 2022 समिटमध्ये त्यांचा सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून समावेश करण्यात आला होता.हिंडेनबर्ग यांनी आपल्या अहवालात अमृतायांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या अहवालात जॅकी डोर्सी, जेम्स मॅकेल्वे यांच्याशिवाय अमृता आहुजाच्या नावाचा समावेश आहे. त्याच्यावर लाखो डॉलर्स बुडवल्याचा आरोप आहे.

ब्लॉक काय आहे?

ब्लॉक हे पूर्वी स्क्वेअर म्हणूनही ओळखले जात होते. कंपनीचे मार्केट कॅप 44 अब्ज डॉलर आहे. कंपनीचा दावा आहे की ज्या लोकांना बँकिंगमध्ये प्रवेश नाही किंवा ज्यांना मर्यादित बँकिंग सुविधा आहेत, त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय आर्थिक तंत्राने मदत करते. हिंडनबर्ग अहवालात असे नमूद केले आहे की ब्लॉकने बँकिंगमध्ये प्रवेश न करता गुन्हेगारांना प्रत्यक्षात मदत केली आहे.कोरोना काळात Block Inc. या प्लॅटफॉर्ममध्ये तेजी दिसली आहे, कारण या अॅपद्वारे 5.1 कोटींहून अधिक व्यवहार केले जातात. आता तुम्ही विचार करत असाल की हे अॅप कसे कमावते, तर हे ॲप इंटरचेंज फीद्वारे 35 टक्के कमाई करते.

कोण आहेत जॅक डोर्सी?

जॅक डोर्सी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1976 रोजी सेंट लुईस, यूएसए येथे झाला. त्यांनी डु बौर्ग हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. जॅक डोर्सींना लहानपणापासूनच संगणकाची आवड होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, हायस्कूलनंतर, त्यांनी मिसौरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु त्यांनी शिक्षण पूर्ण न करता अर्ध्यातूनच कॉलेज सोडले. त्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्यांनी सुरुवातीला प्रोग्रामर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने