लहानपणीची आवडती बार्बी झाली 64 वर्षांची ! वाचा रंजक इतिहास

अमेरिका: प्रत्येका मुलीची पहिली बेस्ट फ्रेंड कोण असं विचारलं तर उत्तर येईल तिची बाहुली. आठवतंय आपल्या बाहुली सोबत खेळलेली भातुकली? तिच्यासाठी आईकडून हट्टाने कपडेही बनवून घेतले असतील नाही? आणि आजीने खाऊ सुद्धा दिला असेल. मुलींचं आवडतं खेळणं बाहुली आहे हे जाणून मॅटेल या कंपनीने ९ मार्च १९५९ रोजी पहिल्यांदा बार्बी जगाला इंट्रड्यूस केली. आणि ती अनेक मुलींची सखी झाली आहे.अमेरिकेच्या डेन्वर, कोलेरॅडो मध्ये १९१६ साली जन्मलेल्या रुथ हँडलर यांनी घर सांभाळत आपल्या पतीच्या साहाय्याने व्यवसायाला सुरुवात केली. मॅटल कॉर्पोरेशन नावाने सुरू केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून त्या विविध खेळण्यांचे उत्पादन करत असत.



अशी सुचली बार्बीची आयडिया :

१९५६ साली हँडलर कुटुंबिय आपली दोन मुलं, बार्बरा आणि केनेथ यांच्यासह युरोपला फिरायला गेले. त्यावेळी जर्मनीमध्ये प्रसिध्द असलेली लीली डॉल रुथ यांनी विकत घेतली. छोट्या बार्बराला ही लीली भलतीच भावली. त्यावेळी अमेरिकेमध्ये केवळ लाकूड किंवा कागदापासून बनवलेल्या बाहुल्यांचीच निर्मिती होत असे.लीलीचं नाजूक रुप पाहून रुथला अमेरिकेमध्ये असं उत्पादन व्हावं, असं वाटू लागलं. पण ती केवळ बाहुली न राहता लहान मुलींबरोबरच किशोरवयीन मुलींना तो एक आदर्श वाटावा, अशी रुथ हँडलर यांची संकल्पना होती.

कंपनीमध्ये झाला विरोध :

मॅटल कंपनीमध्ये त्यांनी जेव्हा हा विचार मांडला तेव्हा, तिच्या पतीसह कोणालाच ही संकल्पना आवडली नाही. अमेरिकेत अशाप्रकारची संकल्पना मूळ धरुच शकणार नाही, असं रुथ यांना कंपनीच्या बैठकीत सांगण्यात आलं.युरोपहून परतल्यानंतर आपल्या मुलीला लागलेल्या लीली बाहुलीच्या वेडावरुन रुथ यांना खात्री होती की अमेरिकेत अशाप्रकारची बाहुली नक्कीच लोकप्रिय होईल. लीलीमध्ये त्यांना अपेक्षित असलेले बदल केले. ९ मे १९५९ साली अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये ही बाहुली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने