BCCI ने बुमराह बाबत घेतला मोठा निर्णय...

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळल्या जात आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून ट्रॉफी कायम ठेवली आहे. आता मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात आहे. त्याचवेळी, या सगळ्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सलाही मोठा फटका बसला आहे. बीसीसीआयचे लक्ष सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त करण्यावर आहे.



अशा परिस्थितीत बुमराह आता पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला जाणार आहे. जसप्रीत बुमराह पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूझीलंडला जाऊ शकतो. NCA आणि BCCI च्या वैद्यकीय पथकाने न्यूझीलंडच्या एका सर्जनची निवड केली आहे ज्याने बुमराहच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी स्टार इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर देखील उपचार केले होते.वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून पाठीच्या समस्येमुळे तो क्रिकेटपासून दूर होता. मात्र, आता बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली तर त्याला बरे होण्यासाठी सुमारे 20 ते 24 आठवडे लागतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने