लॉकडाऊनमधल्या भयंकर दुःखाची हृदयस्पर्शी कहाणी, कसा आहे भीड?

मुंबई: राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांचा भीड सिनेमा आज देशभरात रिलीज झालाय. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमाची आज सगळीकडे चर्चा होती.अखेर आज बहुचर्चित भीड सिनेमा सगळीकडे रिलीज झालाय. कसा आहे भीड? चांगला कि वाईट? जाणून घेऊया



काय आहे सिनेमाची कथा?

सूर्य कुमार सिंग (राजकुमार राव) हा तरुण पोलिस भिडचा सूत्रधार आहे. सूर्यकुमारला आता बंद झालेल्या राज्याच्या सीमांपैकी एका चेकपोस्टचा इन्चार्ज बनवण्यात आला आहे.तो रेणू शर्मा (भूमी पेडणेकर) च्या प्रेमात आहे जी एक डॉक्टर आहे आणि सध्या चेक-पोस्टवर अडकलेल्या कोविड लक्षणे असलेल्या रुग्णांची काळजी घेत आहे.त्रिवेदी बाबू (पंकज कपूर) आहे ज्याला फक्त आपल्या आजारी भावाला वाचवायचे आहे आणि बसमधील सहप्रवाशांना जवळच्या बंद मॉलमधून जेवण मिळवून देण्यासाठी मदत करायची आहे. अशा सगळ्या व्यक्तिरेखा भीड मध्ये एकत्र येतात. आणि समोर येते एक हृदयस्पर्शी कहाणी..अनुभव सिन्हा दिग्दर्शित भीड सिनेमा ब्लॅक अँड व्हाइट आहे. जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये पोळून गेलेल, श्रीमंत मध्यमवर्गीय माणसं घरात बसून मोबाईलवर तेव्हा सिनेमा, वेबसिरीजचा आनंद घेत होते तेव्हा बाहेरून जिथे तिथे कामासाठी आलेले कामगार आपापल्या राज्यात स्थलांतर करत होते. तेव्हा त्यांनी सहन केलेल्या दुःखाची आपण कोणीच कल्पना करू शकत नाही.

११४ मिनीटांचा भीड आपल्याला अंतर्मुख करतो. लॉकडाऊनचा भीषण अनुभव आपल्यासमोर मांडतो. भीड अनुभव सिन्हांचा आणखी माईलस्टोन सिनेमा आहे.आता जरी सगळं जग कोरोना आणि लॉकडाऊनच्या भीषण काळातून बाहेर पडत असलं तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला लॉकडाऊनचा वेदनादायी अनुभव कोणीही विसरू शकत नाही.त्यामुळे भीड पाहून डोळे नकळत पाणावतात. आणि ११४ मिनिटं आपल्याला एक गुदमरवून टाकणारा भीषण अनुभव मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने