"राहुल गांधींना भाजपच हिरो बनवतयं"; ममता बॅनर्जी असं का म्हणाल्या?

कोलकाता : लोकसभा निवडणूक २०२४ ला आता एकच वर्ष शिल्लक राहिलेलं असताना राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना भाजपवर टीका केली आहे. भाजप राहुल गांधीं हिरो बनवू पाहत आहे, ते भाजपचा टीआरपी आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.



तृणमुल काँग्रेसच्या मुर्शिदाबाद इथं पार पडलेल्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करताना ममता बॅनर्जी बोलत होत्या. CM बॅनर्जी म्हणाल्या, राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या टिप्पणीवरुन त्यांना संसदेत बोलू दिलं जात नाहीए यावरुन ते राहुल गांधींना हिरो बनवू पाहात आहे, कारण ज्वलंत मुद्द्यावरुन लोकांचं लक्ष हटवलं जावं. त्या पुढे म्हणाल्या, भाजपशी लढण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा भाजपला मौन पाठिंबा आहे.टीएमसीचे मुर्शिदाबादचे जिल्हाप्रमुख आणि खासदार अबू ताहिर यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या हवाल्यानं सांगितलं की, भाजप आपलं हित जपलं जावं यासाठी असं करत आहे. कारण इतर विरोधीपक्षांना सामान्य लोकांचे प्रश्न मांडता येऊ नयेत. ते राहुल गांधींना विरोधापक्षातील हिरो बनवू पाहत आहेत.

काँग्रेससोबत समन्वयाचा प्रश्नच येत नाही - टीएमसी

तृणमूल काँग्रेसनं हे स्पष्ट केलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या राजकीय धोरण पाहता त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे समन्वय साधण्याची गरज नाही. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तृणमूलचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी बैठकीनंतर सांगितलं की, लोकसभेत काँग्रेसची भूमिका एक आदर्श विरोधक म्हणून संदिग्ध वाटते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने