ऑल इंग्लंड बॅडमिंटन; प्रणोय, लक्ष्य सेन विजयी

लंडन : भारतीय बॅडमिंटनपटूंनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात शानदार केली. एच.एस.प्रणॉय व लक्ष्य सेन या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रतिष्ठेच्या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.भारताचा प्रणॉय व चीन तैपईचा झू वँग यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. पहिल्या गेममध्ये प्रणॉयने सलग पाच गुण जिंकत आपले इरादे स्पष्ट केले. त्यामुळे प्रणॉयकडे ११-४ अशी आघाडी होती.



पण त्यानंतर बॅडमिंटन कोर्टवर चूक झाल्यामुळे प्रतिस्पर्ध्याला ११-१४ अशी आघाडी कमी करता आली. प्रणॉयने पुन्हा झोकात पुनरागमन करीत सलग चार गुण मिळवले. मात्र वँग याने प्रणॉयच्या तोडीसतोड खेळ करीत १९-१९ अशी बरोबरी साधली. प्रणॉयने दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि दमदार स्मॅशच्या जोरावर पहिला गेम २१-१९ असा जिंकला.वॅंगने दुसऱ्या गेमची सुरुवात जबरदस्त केली. त्याच्याकडे ७-२ अशी आघाडी होती. प्रणॉयने आपल्या खेळाचा दर्जा उंचावत बरोबरी साधली. ब्रेकनंतर प्रणॉयकडे १९-१७ अशी आघाडी होती. वँगने हार न मानता १९-१९ अशी बरोबरी करीत लढतीतील आव्हान कायम ठेवले. हा दुसरा गेम २२-२० असा जिंकला. प्रणॉय याने वॅंगवर पाच सामन्यांत विजय मिळवले आहेत.

आव्हान परतवले

लक्ष्य सेन व चाऊ टिएन चेन यांच्यामधील लढतीत चेन याच्याकडे लढतीचा दावेदार म्हणून बघितले जात होते. कारण चेन याला पाचवे मानांकन देण्यात आले होते. तसेच लक्ष्यने दुखापतीमधून बाहेर येत काही दिवसांपूर्वीच बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले होते.पण लक्ष्यने पाचव्या मानांकित चाऊ टिएन चेन या खेळाडूवर विजय नोंदवला. पहिला गेम त्याने २१-१८ असा जिंकला. त्यानंतर पुढील गेममध्येही चेनकडून कडवी झुंज मिळाली. पण लक्ष्यने हा गेम २१-१९ असा खिशात टाकला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने