'राहुल गांधींनी परदेशात भारताचा अपमान केलाय'; संसदेत भाजप नेते आक्रमक

दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान 17 बैठका होणार आहेत.सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मंत्र्यांची बैठक घेतली. दुसरीकडं, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांची रणनीती आखण्यासाठी इतर विरोधी पक्षांसोबत विचारमंथन केलं.दरम्यान, भाजपनं आज संसदेत राहुल गांधी  यांच्या ब्रिटनमधील भाषणावर हल्ला चढवला. जिथं ते म्हणाले की, देशाची लोकशाही ‘पूर्ववत झाली आहे’. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि माजी काँग्रेस अध्यक्षांना माफी मागण्यास सांगितलं.



पियुष गोयल यांनी राज्यसभेत राहुल यांना घेरलं

केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील भाजप नेते पियुष गोयल  यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'राहुल गांधींनी परदेशी भूमीवर भारतातील जनतेचा आणि सदनाचा अपमान केला आहे. भारतात भाषण स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकजण संसदेत आपले विचार मांडत असतो. त्यांना भारताबाबत अशी टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफी मागावी.' दरम्यान, विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभा-राज्यसभेचं कामकाज तहकूब केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने