PM मोदींचं 'ते' भाकित खरं ठरलं; त्रिपुरासह 'या' राज्यांत भाजपला झाला मोठा फायदा

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मेघालयची  राजधानी शिलाँग इथं एका सभेला संबोधित करताना म्हटलं होतं, विरोधक 'मर जा मोदी-मर जा मोदी' म्हणताहेत, पण जनता मोदी तेरा कमल खिलेगा म्हणत आहे.पंतप्रधानांचं हे भाकित खरं ठरताना दिसत आहे. त्रिपुरामध्ये भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय, नागालँडमध्ये 12 जागांवर आघाडी घेतलीये. त्यापैकी 2 जागा जिंकल्या आहेत. आता हा सामना मेघालयात अडकला आहे. 60 जागांच्या राज्यात NPP 24 जागांवर आघाडीवर आहे, जे बहुमतापेक्षा खूपच कमी आहे. अशा स्थितीत एनपीपी भाजपसोबत 5 जागा आणि इतर काही जागांसह सरकार स्थापन करू शकतं.

तिन्ही राज्यातील सत्तेत भाजपचा वाटा

यापूर्वीही भाजप  एनपीपी सरकारचा भाग होता. त्यामुळं तिन्ही राज्यातील सत्तेत भाजपचा वाटा असेल. मतांच्या प्रमाणातही भाजपची स्थिती चांगली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये एकेकाळी सर्वात कमकुवत समजल्या जाणाऱ्या भाजपला त्रिपुरामध्ये 39 टक्के मतं मिळाली आहेत. याशिवाय, नागालँडमध्येही  18 टक्के लोकांनी त्याला पसंती दिलीये.

मेघालयात 8 टक्के मतं भाजपच्या खात्यात

मेघालयात 8 टक्के मतं भाजपच्या खात्यात जात आहेत. मेघालयात टीएमसीला 5 जागा मिळू शकतात. मात्र, ती सत्तेपासून दूर राहणार आहे. दरम्यान, एनपीपीचे कोनराड संगमा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यात बैठक झाल्याचं वृत्त आहे. अशा परिस्थितीत दोघं मिळून सरकार स्थापन करू शकतात.



आदिवासीबहुल भागात भाजपला फायदा

भाजपसाठी त्रिपुराचा विजय सर्वात महत्त्वाचा असेल. 2018 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपला याआधी इथं तुरळक यश मिळालं होतं, मात्र 5 वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदाच सत्ता मिळाली. अशा स्थितीत इथं त्याची पुनरावृत्ती करणं त्याच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. बंगाली आणि आदिवासी समाजाची लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपचा विजय देशभरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषत: आदिवासीबहुल भागात भाजपला याचा फायदा होऊ शकतो. आदिवासींची लोकसंख्या 1 कोटीहून अधिक असलेल्या मध्य प्रदेशात यंदा निवडणुका होणार आहेत.

निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का

आता काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर या निवडणुका पक्षासाठी फारच निराशाजनक आहेत. या वर्षी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि अशा प्रकारे खातं उघडणं त्यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. त्रिपुरामध्ये काँग्रेस केवळ 4 जागांवर आघाडीवर असून त्यांना केवळ 8 टक्के मतं मिळाली आहेत. याशिवाय डाव्या पक्ष सीपीएमलाही केवळ 24 टक्के मतं मिळू शकतात. नागालँड आणि मेघालयमध्ये काँग्रेसचे कलही फारसे उत्साहवर्धक नाहीयेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने