सीबीआयच्या छाप्यानंतर राबडी देवी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

पटणा: जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी मोठी कारवाई करत सीबीआयने सोमवारी राबडी देवी यांच्या पटणा येथील घरावर छापा टाकला.सीबीआयच्या चार तासांच्या चौकशीनंतर राबडी देवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'हे आमच्या इथं चालत रहातं' असं म्हणत त्यांनी कारवाईला गांभीर्याने घेतलं नाही. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, प्रत्येक महिन्यात सीबीआयची चौकशी होत असते. २०२४ पर्यंत ते येत राहतील आम्हाला त्याचा फरक पडत नाही.



दरम्यान सीबीआयने लालूप्रसाद यादव, राबडी देवी, मिसा भारती यांच्यासह 14 जणांना समन्स पाठवले होते. सीबीआयने या लोकांना 15 मार्च रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.या 14 वर्ष जुन्या प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जमिनीच्या बदल्यात 7 जणांना रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे. त्यापैकी 5 जमीनीची विक्री झाली होती, तर 2 लालूंना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने