भारतातल्या प्रत्येक हालचालींवर चीनची नजर; देशातले 10 लाख सीसीटीव्ही कॅमेरे...

नवी दिल्लीः चीनमधील कंपन्यांमध्ये तयार होणारे सीसीटीव्ही इतरांच्या तुलनेने स्वस्त असतात. त्यामुळे ते खरेदी केले जातात. मात्र त्याच सीसीटीव्हीमुळे देशावर संकट येण्याचा धोका वर्तवला जातोय.भारतातल्या १० लाख सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चीन देशातल्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय सतर्क झालं आहे. देशात सायबर सुरक्षेच्या दृष्टीने १० लाख सीसीटीव्ही कॅमेरे धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे.अरुणाचल प्रदेशातील काँग्रेस आमदार निनोंग इरिंग यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन करत चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. लोकांनीही आपल्या घरामध्ये चिनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवू नये, याबाब जनजागृती करावी असंही आमदार निनोंग इरिंग यांनी म्हटलं आहे.



अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशांनी चीनकडून हेरगिरीचा धोका लक्षात आल्याने योग्य ती खबरदारी घेतली आहे. शिवाय सीसीटीव्ही बनवणाऱ्या चिनी कंपन्यांवर कारवाईदेखील केली आहे. त्यामुळे भारताने याबाबत जागरुक राहावं, असं मोदींना दिलेल्या पक्षामध्ये इरिंग यांनी म्हटलं आहे.'याच कॅमेऱ्यांच्या मदतीने चीन भारतावर नजर ठेवून असल्याचा संशय आहे. आपलं आयटी सेक्टर सर्व बाबींसाठी सक्षम आहे. आपण आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वदेशी क्लाऊड आधारित सर्व्हर सुरु करु शकतो. त्यादृष्टीने पावलं उचलावीत' असंही पत्रामधअये इरिंग म्हणाले.आमदार इरिंग यांच्या पत्राने एकच खळबळ उडाली असून साधारण सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले १० लाख सीसीटीव्ही कॅमेरे चीनमधून आल्याची माहिती आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने चीन भारतात लक्ष ठेवून असल्याचं सांगिलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने