'...मग उद्धव ठाकरेंनाही चोर ठरवणार आहेत का?'; फडणवीसांनी घेतला राऊतांचा समाचार

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला. सत्ताधारी पक्षाकडून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले . राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्याचा मुद्दा चांगलाच तापला. राऊतांवर हक्कभंगाची मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.मला असा वाटतं की चोरमंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं.. कशाकरिता चोरमंडळात काम करता. सत्तापक्ष-विरोधीपक्ष आरोप-प्रत्यारोप हा वेगळा विषय आहे.हा सत्तापक्षावर आरोप नाहीये विधान मंडळावर आरोप आहे. हे सहन करण्यासारखं नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.



जर चोर या विधीमंडळाबाबत बोललं जात असेल तर विधीमंडळाला अर्थ राहणार नाही. मग कुणीही उठेल आणि काहीही बोलेल. म्हणूनच हक्कभंगाची तरतूद आहे. कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये, असेही फडणवीस म्हणाले.संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल. उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का? असा सवाल देखील फडणवीसांनी संजय राऊत यांना विचारला आहे.महाराष्ट्र विधानमंडळाची अतिशय थोर परंपरा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विधानमंडळ हे महाराष्ट्राचे आहे. हा विरोधी वा सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नाही. हे सहन केले तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. सर्वोच्च सभागृहाचा हा घोर अपमान आहे.असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, हा स्पष्ट संकेत देणे गरजेचे आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने