2024 पूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करा; रामदेव बाबांचं मोदी सरकारला आवाहन

मुंबई: योगगुरू बाबा रामदेव  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या केंद्र सरकारकडं देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची  मागणी केलीये.सरकारनं या दिशेनं लवकरात लवकर प्रभावी पावलं उचलावीत आणि 2024 पूर्वी हा कायदा लागू करावा, असंही ते म्हणाले आहेत.आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिरउभारलं जावं, हे जनतेचं स्वप्न आहे. पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचं उद्घाटन होणार, ही आनंदाची बाब आहे. देशात कलम-370 हटवण्यात आलं. आता फक्त दोनच कामं उरली आहेत, असं बाबा रामदेव म्हणाले.



UCC आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचं काम 2024 पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. नऊ दिवस चालणाऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी रामदेव बाबांनी या गोष्टी स्पष्ट केल्या. योगगुरू रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या उपस्थितीत ऋषीग्राममध्ये नऊ दिवसीय संन्यास दीक्षा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं.योगगुरू म्हणाले, राम मंदिर जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे. संन्यास घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचं अनुष्ठान केलं जाईल. सर्व मुलं-मुली ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार आहेत. पतंजली ऋषीग्राममध्ये 60 तरुण आणि 40 तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. स्वामी रामदेव सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने