मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतो ? त्याची निवड कशी होते? पगार किती असतो?

मुंबई: निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने नुकताच ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी समिती नेमणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने दिली आहे. मुख्य निवडणुक आयुक्तांच्या निवडीमध्ये हा खूप मोठा बदल आहे.पण तुम्हाला माहिती आहे का मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतो ? त्याची निवड कशी होते? पगार किती असतो? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतो ?

मुख्य निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख असतात ज्यांना राष्ट्रीय आणि राज्य विधानमंडळ आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निष्पक्ष निवडणुका घेण्याचा घटनात्मक अधिकार असतो.



मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड कशी होते?

पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तची निवड करतात. त्यांच्या पदाची मुदत ही सहा वर्षे असते. पण या सहा वर्षात जर निवडणूक आयुक्त वयाचे ६५ वर्ष पुर्ण करत असेल तर त्याला त्या पदावरुन राजीनामा द्यावा लागतो. त्यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखाच दर्जा मिळतो.

मुख्य निवडणूक आयुक्ताचा पगार किती असतो?

मुख्य निवडणूक आयुक्ताला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इतकाच पगार असतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने