येडियुरप्पा यांचा लेक करणार का पक्षात बंड ?भाजपच्या उत्तराधिकारीपदावरून घमासान

कर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा मुलगा बी वाय विजयेंद्र यांच्याबाबत कर्नाटक भाजपमध्ये असंतोष दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, पक्षाचे अनेक नेते विजयेंद्र यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री असताना येडियुरप्पा यांनी विजयेंद्र यांना आपला उत्तराधिकारी जाहिर केले. पण कर्नाटकातील पक्षश्रेष्ठींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.भाजपने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, राज्यात त्यांच्या मर्जीने तिकीटवाटप होणार नाही.



तिकीट वाटपाचा निर्णय कुणाच्याही स्वयंपाकघरात किंवा घरात होणार नाही, असे भाजपचे सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी सी. टी. रवी यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने येडियुरप्पा यांना धक्का बसला आहे.आपला मुलगा बी. वाय. विजयेंद्र हा शिकारीपुरा येथून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, अशी येडियुरप्पा यांनी घोषणा केली असून, त्यावर हायकमांड नाराज आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्री असलेले व्ही. सोमन्ना हेही येडियुरप्पा, विजयेंद्र आणि त्यांच्या समर्थकांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.त्यांनी विजयेंद्र यांच्यावर अनेकवेळा अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. याप्रकरणी सोमन्ना यांनी थेट दिल्ली गाठली. याआधीही भाजपमधील नेते येडियुरप्पा यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत आहेत.

2009 मध्ये राजकीय पटलावर पाऊल

विजयेंद्र यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. विजयेंद्र हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी असून राज्यात सर्वोच्च पद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयेंद्र यांनी 2009 मध्ये भाजपच्या युवा मोर्चातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. प्रत्येक संकटाच्या काळात विजयेंद्र यांनी वडिलांना साथ दिली आहे. जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जात होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने