तुम्हाला पण नित्यानंद बाबाच्या कैलास देशाचा नागरिक व्हायचं आहे ? अशी मिळते सिटीझनशीप

दिल्ली: बलात्काराच्या आरोपातून फरार झालेला नित्यानंद बाबा आपल्या कथीत कैलास देशाची नागरिकता वाटत आहे. यासाठी त्यांनी रितसर व्हेरीफाइड सोशल मीडिया अकाउंटवरून नागरिकता घेण्यासाठी आवाहन केलं आहे. यात लोकांना सांगितलं जात आहे की, जर तुम्ही हिंदू असाल किंवा हिंदू विचारधारेशी जोडण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कैलासाची मोफत इ-नागरिकता मिळेल. हे घेऊन तुम्ही वैश्विक हिंदू परिषदेचा भाग होऊ शकाल.कैलासाच्या अधिकृत अकाउंटवरून नागरिकतेविषयी बरेच ट्वीट करण्यात आले. नागरिकतेसाठी जी लिंक दिली गेली आहे त्यावर क्लिक करून पेज ओपन होतं. ज्यात नाव, इमेल, पत्ता, शहर, राज्य, देश, व्यवसाय आणि फोन नंबर भरावा लागतो. नागरिकता देण्यासाठी ही सगळी माहिती मागितली जाते.कैलासाच्या पेजवर सांगण्यात येत आहे की, अशाप्रकारे नागरिकता घेता येत आहे. पण ही नागरिकता घेतल्यावर त्या देशात कसे जायचे किंवा तिथे कसे रहायचे याविषयीची कोणतीही माहिती इथे देण्यात आलेली नाही.



कोण आहे स्वामी नित्यानंद ?

स्वामी नित्यानंद यांचं खर नाव राजशेखरन असून त्याने योग, वेद, तंत्र, शैव याचा अभ्यास केला होता. नित्यानंद याने मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. मात्र या पदव्या खोट्या असल्याचं बोललं जातं. त्याने रामकृष्ण मठमधून आपले शिक्षण पुर्ण केले, असंही म्हणतात.

स्वामी नित्यानंदवर आहे बलात्काराचा आरोप

२०१० मध्ये स्वामी नित्यानंद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्रीसह आक्षेपार्ह अवस्थेत होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा त्याने केला होता. याशिवाय २०१२ मध्ये नित्यानंदवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नित्यानंद भारतातून पळून गेला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने