'सगळं मलाच पाहावं लागतं', दीपाली सय्यद यांनी पवारांच्या मनातील खंत बोलून दाखवली

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यावर सत्ताधारी सडकून टीका करताना दिसत आहे. भाजपसोबत जात सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. सत्तांतरादरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खरं सरकार राष्ट्रवादी चालवत होतं. असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकासआघडीचे सरकार स्थापन केले. यावेळी मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांना बसवण्यात आले होते. याचपार्श्वभूमिवर बोलताना दीपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.



दीपाली सय्यद महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे, शिवसेना, महाविकास आघाडीवर भाष्य केलं. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात.शिवसेनेचा वापर सगळीकडे होत आहे. असा आरोप सय्यद यांनी यावेळी केला. तसेच, शिवसेना काहीच करत नाही, असं अजित पवार एकदा म्हणाले होते. असा खुलासाही सय्यद यांनी यावेळी केला.

दीपाली सय्यद म्हणाल्या...

अजित पवार शिवसेनेबद्दल खूप चांगले बोलतात. मात्र, मला एक दिवस म्हणाले की, मंत्रालयात तुमचे मुख्यमंत्री येत नाहीत. तुमचे पक्षप्रमुख येत नाहीत. कामचं करत नाहीत. सगळं मलाच पाहावं लागतं. सात दिवस मलाच बसाव लागतं. शिवसेना काहीच करत नाही. असा खुलासा सय्यद यांनी केला.याचा अर्थ कुठेतरी आपण चुकलो आहोत. आपला निर्णय चुकला आहे, असं सय्यद म्हणाल्या.शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. त्यामुळे सगळीकडे केवळ दंगली घडविण्याचे काम केले जात आहे असा हल्लाबोल करतानाच सय्यद यांनी आपल्याकडील सगळं गेल्यानंतर ती गोष्ट परत कशी मिळणार? असा सवालही उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने