शाहरुखच्या लाडक्या लेकाला बेड्या ठोकणाऱ्या Sameer Wankhede यांच्यावर येणार बायोपिक..

मुंबई: सध्या मनोरंजन विश्वात प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक तयार करण्याकडे जास्तच भर दिला जातो. कारण प्रेक्षकांना आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयूष्याला रुपेरी पडद्यावर पाहणे जास्त आवडत असल्याचं बोललं जातं.आताप्रर्यंत बॉलिवुडमध्ये अनेक व्यक्तीवर बायोपिक तयार करण्यात आली आहे. त्यातच आता इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या महान राजकीय नेत्यावरही बायोपिक तयार होत आहेत.आता त्यातच आणखी एका व्यक्तीवर बायोपिक तयार करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतिच करण्यात आली आहे.



हा व्यक्ती आहे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे.समीर वानखेडे यांच्यावर आता बायोपिक बनणार असल्याचे वृत्त आहे. वर्षअखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरु होणार आहे.समोर आलेल्या वृत्तानुसार, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक 'मैं अटल हूं'च्या निर्मात्यांपैकी एक असलेला झीशान अहमद मुंबईत NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये टीव्ही पत्रकार निधी राजदान यांचाही सामावेश असेल. समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संवादावर हा चित्रपट अवलंबुन असेल असे असल्याचे सांगण्यात येत आहे.समीर वानखेडे यांचा बायोपिक लिहिणाऱ्या प्रीतम झा यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात वानखेडे यांच्या आयुष्याशी संबंधित ते पैलू सांगण्यात येणार आहेत, ज्यांबद्दल अजूनही लोकांना माहिती नाही.चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या कास्टिंगचे काम सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. समीरच्या भूमिकेसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांशी बोलणी सुरू असून, चित्रपटाचे स्क्रिप्टिंग पूर्ण झाल्यानंतर कोणाला फायनल केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने