ED, CBI विरोधात काँग्रेससह 14 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका; 5 एप्रिलला होणार सुनावणी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 14 विरोधी पक्षांनी तपास यंत्रणांचा (ED आणि CBI) गैरवापर केल्याचा आरोप करत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडलं.सिंघवी (Senior Advocate Abhishek Manu Singhvi) म्हणाले, न्यायालयानं अटक आणि जामीन याबाबत मार्गदर्शक तत्त्वं निश्चित करावीत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना सातत्यानं लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी आता 5 एप्रिल रोजी होणार आहे.



विरोधी नेत्यांना अटक करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा मनमानी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी घेण्यास सर्वोच्च  न्यायालयानं  सहमती दर्शवली आहे. काँग्रेस, आप, डीएमके, आरजेडी, बीआरएस, टीएमसीसह 14 राजकीय पक्षांचा यात समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने