ईडीच्या प्रदीर्घ चौकशीमुळे तेजस्वींची गर्भवती पत्नी बेशुद्ध; रुग्णालयात दाखल

बिहार: नोकरीच्या बदल्यात जमीन दिल्याप्रकरणी सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना आज समन्स बजावले आहे. सीबीआयने त्यांना पाठवलेले हे दुसरे समन्स आहे, पहिले ४ फेब्रुवारी रोजी पाठवले होते. ईडी देखील लालूप्रसाद यादव यांच्यावर लक्ष ठेवून आहे. ईडीने लालूप्रसाद यादव यांच्या मुलींच्या घरी देखील छापेमारी केली. दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव हे त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीमुळे आज सीबीआयसमोर हजर राहू शकत नाहीत. अशी माहिती समोर येत आहे. तेजस्वी यादव यांनी सीबीआयकडे वेळ मागितली आहे. 



ईडीच्या छाप्यानंतर त्यांच्या पत्नीला काल दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्या गरोदर आहेत. १२ तासांच्या चौकशीनंतर ती बीपीच्या समस्येमुळे बेशुद्ध पडली.ईडीने यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह लालूंच्या तीन मुलींकडून ७० लाखांची रोकड जप्त केली. २ किलोपेक्षा जास्त सोने आणि ९०० अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या सोन्यात १.५० किलो दागिने आहेत, तर ५४० ग्रॅम सोन्याचे नाणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने