आजच्या राजकारणात मी फीट बसत नाही; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

मुंबई : एका मुलाखतीत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सडेतोड भाष्य केलं आहे. यावेळी आपण आजच्या राजकारणात मिसफीट आहोत, अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. लेखक अंबरीश मिश्र यांनी त्यांची मुलाखत घेतली.राज ठाकरे म्हणाले, "मी मागे माझ्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी अपघातानं राजकारणात आलो. राजकीय वातावरण माझ्या घरात होतो, त्या सगळ्यातून मी राजकीय व्यंगचित्रकार झालो पण आत्ता महाराष्ट्रातलं सर्व राजकारण बघितलं तर मला असं वाटतं की मी या राजकारणासाठी मिसफिट आहे"



महाराष्ट्राची अशी परिस्थिती मी आजवर पाहिली नाही. ज्या प्रकारे सर्व राजकीय पक्षांची स्थिती झाली आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामुळं कोणीही व्यक्त व्हायला लागलंय आहे, व्यक्त व्हायला पैसे लावले पाहिजेत. कुठलाही आगा ना पिछा कोणीही काहीही बोलतंय, टीव्हीवरही ते दाखवलं जात आहे. या सर्वाचा आता वीट यायला लागला आहे. याचे रिल्स येत आहेत त्यावर कोणीही काहीही बोलतंय, अशा शब्दांत राज्यातील राजकारणाबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.लोकांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे, असा महाराष्ट्र कोणी पाहिला नाही. ज्या महाराष्ट्रानं देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आहे, अशी खंतही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने