अमेरिका देखील बनावट नित्यानंदच्या फाश्यात अडकला, अशी झाली पोलखोल

अमेरिका: स्वयं-स्टाईल गॉडमॅन आणि कोर्ट-घोषित फरारी नित्यानंदच्या 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा'ने ३० हून अधिक यूएस शहरांसह 'सांस्कृतिक भागीदारी' करार केला आहे. एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.    अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील नेवार्क शहराने काल्पनिक देशासोबतचा 'सिस्टर सिटी' करार रद्द केल्याचे म्हटल्यानंतर काही दिवसांनी हा अहवाल आला आहे. नेवार्क आणि काल्पनिक 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा' यांच्यातील 'सिस्टर सिटी' करार यावर्षी १२ जानेवारी रोजी झाला आणि नेवार्कमधील सिटी हॉलमध्ये एक समारंभ आयोजित केला गेला होता.नित्यानंद ने २०१९ मध्ये संयुक्त राज्य कैलासा ची स्थापना केली होती. यांच्या वेबसाईटनुसार ३० हून अधिक अमेरिकी शहरांनी बनावट देश कैलासा सोबत सांस्कृतिक करार केला होता. एका वेबसाईटनुसार या शहारांमध्ये रिचमंड, वर्जीनिया, ओहायो, डेटन आणि बुएना पार्क सोबत अनेक शहरांचा समावे आहे. 

फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की आम्ही बोगस बाबा नित्यानंद वर लक्ष ठेवून आहोत. त्याच्याकडे फसवणूक केलेल्या शहरांची मोठी यादी आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार राजकीय लोक देखील नित्यानंद याच्या फाश्यात अडकले आहेत. सरकार चालवणारे काही लोक देखील बनावट देशापुढे नतमस्तक झाले आहेत. नित्यानंदनुसार, अमेरिका संसदेच्या दोन सदस्यांनी कैलासला 'स्पेशल काँग्रेसनल रिकग्निशन' दिले आहे. या काँग्रेस सदस्यांपैकी एक कॅलिफोर्नियाच्या नॉर्मा टोरेस आहेत.नेवार्क शहराचे कम्युनिकेशन विभागाचे प्रेस सचिव सुसान गारोफालो यांनी एका मेल मध्ये सांगितले. जशी आम्हाला कैलासाच्या आजूबाजूची माहिती मिळाली. तशी नेवार्क शहराने कारवाई केली. 'सिस्टर सिटी' करार रद्द केला. नित्यानंदला बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक गुन्ह्यांमध्ये भारतात हवा आहे. मात्र तो आरोप फेटाळत आहे. 



कोण आहे नित्यानंद ?

स्वामी नित्यानंद याचं खर नाव राजशेखरन असून त्याने योग, वेद, तंत्र, शैव याचा अभ्यास केला होता. नित्यानंद याने मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. मात्र या पदव्या खोट्या असल्याचं बोललं जातं. त्याने रामकृष्ण मठमधून आपले शिक्षण पुर्ण केले, असंही म्हणतात.

बलात्काराचा आहे आरोप -

२०१० मध्ये स्वामी नित्यानंद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्रीसह आक्षेपार्ह अवस्थेत होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा त्याने केला होता. याशिवाय २०१२ मध्ये नित्यानंदवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नित्यानंद भारतातून पळून गेला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने