'या' राज्यात घडला इतिहास; तब्बल 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडून आली महिला उमेदवार

नागालँडगेल्या 14 विधानसभा निवडणुकीत या राज्यात एकदाही महिला आमदार निवडून आलेली नाही. नागालँडनं पहिल्यांदाच एका महिलेला विधानसभेवर निवडून दिलंय.ईशान्येकडील नागालँड विधानसभेत गेल्या 60 वर्षांत एकही महिला आमदार निवडून येऊ शकली नव्हती. मात्र, आज इतिहास घडला असून स्वातंत्र्यानंतर तब्बल 60 वर्षांनंतर नागालँडच्या विधानसभेत महिला पोचलीये.भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या  हेकानी जाखलू  या राज्यातील पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत. हेकानी जाखलू यांनी दिमापूर III च्या जागेवर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते अझेतो झिमोमी यांचा 1,536 मतांनी पराभव करून विजय मिळवला.



हेकानी जाखलू यांना सभागृहात आणखी एका महिला आमदाराची साथ मिळू शकते. नागालँडसाठी हा दुहेरी आनंद असू शकतो. NDPP चे सलहौतुओनुओ क्रुसे हे पश्चिम अंगामी मतदारसंघात 400 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत 14 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. याआधी नागालँडमध्ये एकही महिला आमदार म्हणून निवडून आली नाही.नागालँड विधानसभेसाठी यंदाच्या निवडणुकीत 183 उमेदवारांमध्ये चार महिलांचा समावेश होता. मुख्यमंत्री नेफियु रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपी 2018 च्या गेल्या निवडणुकीपासून भाजपसोबत युती करत आहे. मागील निवडणुकीत 30 जागा जिंकणारी युती सध्या 39 वर आघाडीवर आहे. 60 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 31 आहे. जागावाटपाच्या करारानुसार भाजपनं 20 जागा लढवल्या, तर एनडीपीपीनं 40 जागा लढवल्या.

कोण आहेत हेकानी जाखलू?

हेकानी जाखलू या व्यवसायानं वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दिमापूरमधील हेकानी जाखलू यांनी दिल्ली आणि लंडन इथं शिक्षण घेतलं. त्यांनी तब्बल 18 वर्षे एनजीओमध्ये काम केलं आहे. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. त्यांनी सात महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचे पती अलिजा जाखलू दिमापूरमधील मोठे कंत्राटदार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने