अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी डिझायनर अनिक्षा ताब्यात; घरावर छापेमारी

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या फसवणूक प्रकरणी डिझायनर अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच वडील बुकी अनिल जससिंघानी यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. अनिक्षाला उल्साहनगर येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.



काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल 1 कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती.एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्शाने तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक मेसेज एका अज्ञात फोन नंबरवरुन पाठवण्यात आले. तसेच डीझायनर धमकावण्याचा प्रयत्न करत होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने