ग्राहकांनो सावधान! शिळी भाजी केमिकलमध्ये बुडवून अशी केली जातेय ताजी

नाशिक : बाजारातील भाज्या ताज्या आणि सकस असल्याचं समजून आपण खरेदी करतो. पण दोन ते चार दिवसांपूर्वी काढलेल्या किंवा उपटलेल्या भाज्या एवढ्या ताज्या कशा राहतात याचा आपण कधी विचार केला आहे का?केमिकलचा वापर करून भाज्या ताज्या ठेवता येतात याचा आपण कधी विचारही केला नसेल पण सध्या असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केमिकलमध्ये बु़डवल्यानंतर लगेच भाजी ताजी होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.



अधिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. त्यामध्ये एका बादलीत ठेवलेल्या केमिकलयुक्त पाण्यात शिळी झालेली भाजी बुडवल्यानंतर काही क्षणात ती ताजीतवानी झालेली दिसते. त्यामुळे आता बाजारातील प्रत्येक ताज्या दिसणाऱ्या भाज्या खरोखर ताज्या असतील याची शाश्वती नाही. अशा भाज्या विक्री केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.

भाज्या ताज्या करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल बिहारमधील एका कंपनीत तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे. तर हे केमिकल भाज्या ताज्या करण्यासाठी तयार करण्यात आले नसून ते पिकावरील फवारणीसाठी तयार करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी अशा ताज्या वर केमिकलयुक्त भाज्या खरेदी करण्यापासून सावध राहायला पाहिजे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने