साहेबांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि त्यांचं स्मारकही होईल; CM शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई: गोपीनाथ मुंडे साहेबांनी १८ पगड जातींवर प्रेम करण्याचं काम त्यांनी केलं. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पट बदलणारं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. पंकजा मुंडे यांच्या मागणीला मान देत शिंदेंनी ही घोषणा केली आहे.गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भारती पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कामाचं कौतुक केलं आहे. सायकलवर शबनम झोळी गळ्यात अडकवून भाजपा वाढवण्याचं काम त्यांनी केलं, असंही ते म्हणाले.



या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेचं स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने हॉस्पिटल उभारा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी पंकजा यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि त्यांचं स्मारकही होईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदेंनी बऱ्याच घोषणा केल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी केली होती. ही वसतिगृहेही लवकरात लवकर उभारण्यात येतील, असं आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिलं. तसंच उसतोड कामगार महामंडळ बळकट करू, या महामंडळाला कधीही निधी कमी पडणार नाही, असंही शिंदे म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने