ताप अंगावर काढू नका; राज्यात २ मृत्यू झाल्यावर आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई: राज्यातला कोरोनाचा प्रभाव ओसरताच आता H3N2 ची नवी भीती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या राज्यामध्ये २ मृत्यू झाले आहेत. त्याबद्दल बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.आरोग्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. तसंच राज्यातल्या रुग्णांच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. सावंत म्हणाले, "१२ मार्चला राज्यात ३५२ रुग्ण आहेत. परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलेलं, रात्री १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. नागपूरमधल्या एका इसमाचाही मृत्यू झाला आहे.H3N2 ने लगेच मृत्यू होत नाही, उपचार घेतला तर तो रुग्ण बरा होतो."



राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे हे सांगताना तानाजी सावंत म्हणाले, "सर्व रुग्णालयांमध्ये आम्ही याबद्दल अलर्ट दिला आहे. अशा आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांना सूचना आहे, जर ताप आला असेल, तर अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरचा सल्ला घ्या."

या व्हायरसची लक्षणे काय आहेत?

  • खोकला

  • अस्वस्थ वाटणं

  • उलट्या होणं

  • घशात खवखव

  • अंगदुखी

  • बद्धकोष्ठता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने