"गाजर हलवा अर्थसंकल्प" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंची बजेटवर टीका

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला. पण हा अर्थसंकल्प विरोधकांना रुचलेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक जुमला असल्याचं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलंय तर हा 'गाजर हलवा अर्थसंकल्प' असल्याचं शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात कोरोनाचं संकट होतं. या काळात प्रत्येकवेळी केंद्राकडं साधारण २५००० कोटींची जीएसटीची थकबाकी बाकी असायची. आज सकाळीच मी संभाजीनगरमधील काही शेतकऱ्यांशी बोललो. अवकाळी पाऊसाचे पंचनामे करायला त्यांच्या बांधावर एकही शेतकरी गेलेला नाही. एकूणच आजचा अर्थसंकल्प म्हणजे सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे.



अवकाळी पाऊस झाला तसा मुंबईत गडगडाटही झाला पण पाऊस काही झाला नाही. त्यामुळं हा अर्थसंकल्प गरजेल तो बरसेल काय असा आहे. एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असा मी याचा उल्लेख करेल. कारण यातून बऱ्याचशा योजना या आम्ही जाहीर केल्या होत्या त्याचचं नामांतर करुन पुढे मांडल्या आहेत.एक गोष्ट बरी आहे की एक योजना आम्ही मुंबई महापालिकेच्यावतीनं मुंबईत सुरु केली ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. ही योजना आमची त्यावेळी यांना फीता कापायचं भाग्य मिळायचं. पण आता ही योजना राज्यभर राबवणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने